अनवरत भंडळ (६)
आध्यात्मिक साधनाः सुंदर जगण्यासाठी योगी श्री अरविंदांनी विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात आध्यात्मिक तत्त्वज्ञानाची जी पुनर्मांडणी केली, तिचा सारांश आपण मागील लेखांकात पाहिला. विशातील मूळ सत्य हे आनंदस्वरूप व एकमेवाद्वितीय असे चैतन्य असून तेच असंख्य रूपे, आकार व सामर्थ्य धारण करून क्रमाक्रमाने विविध पातळ्यांवर अवतीर्ण झाले आहे. भौतिक पातळीवर त्या चैतन्याने संपूर्ण जडतत्त्वाचे आवरण घेतले व आंधळ्या/अज्ञानी …